सावंतवाडी पत्रकार संघाकडून पत्रकार सुनील राऊळांना आर्थिक मदत…

395
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१९: नेमळे येथील पत्रकार अर्जुन उर्फ सुनील राऊळ यांना सावंतवाडी पत्रकार संघाकडून आर्थिक मदत देण्यात आली. शेतात काम करत असताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेची दखल घेत तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या हस्ते सुनील राऊळ यांना आर्थिक मदत देण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सचिव मयूर सराठकर, उपाध्यक्ष दीपक गावकर, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, प्रा. रुपेश पाटील, नरेंद्र देशपांडे, युवा पत्रकार भुवन नाईक, नितेश देसाई, दिव्या वायंगणकर आदी उपस्थित होते.

राऊळ हे गेली अनेक वर्षे ग्रामीण पत्रकारिता जोपासण्याचे काम करत आहेत, त्याचबरोबर ते शेती काम सुद्धा करतात. काही दिवसांपूर्वी शेती काम करत असताना ट्रॅक्टरचे चाक लागल्यामुळे त्यांचा अपघात झाला. यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेतून ते कसेबसे सावरले याची दखल घेत सामाजिक बांधिलकी जोपासत तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना ही मदत करण्यात आली.