ऐनारी येथे उद्या होणार “शायरी तमाशा” खेळ…

192
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.०१: येथील ऐनारी गावामध्ये शिमगोत्सवात प्रसिद्ध असलेला शायरी तमाशा हा खेळ उद्या भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. पांडवकालीन पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐनारी देवस्थानातील हा ९ दिवसांचा उत्सव असून या उत्सवासाठी मुंबईस्थित चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

या उत्सवादरम्यान माहेरवाशीणी येवून पालखीची ओटी भरतात. या शिमगोत्सवात पारंपरिक पध्दतीने शायरी तमाशा खेळण्याची आजही प्रथा सुरू आहे. होळीपासून नऊ दिवस हा उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो.

उद्या सकाळी पूजा अर्चा तसेच रात्री ढोल ताशांच्या गजरात, अबीर-गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात पालखी नाचविली जाते. त्यानंतर विविध देवदेवतांची सोंगे असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी भाविकांनी या सरत्या खेळाचा लाभ घ्यावा असे आवाहन ऐनारी ग्रामस्थांनी केले आहे.