गवा रेड्याच्या हल्ल्यात चौकुळ येथील शेतकरी जखमी…

1016
2
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.०५: गवा रेड्याने हल्ला केल्याने चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी सात वाजता घडली सिताराम विश्राम गावडे ( वय ८० ) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी आंबोली येथे उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविले. ते आज सकाळी आपल्या घराच्या मागे असलेल्या शेतात गेले होते. यावेळी हा प्रकार घडला.