विशाल परबांच्या माध्यमातून सावंतवाडीत मुस्लिम बांधवाना शिरकुर्मा साहित्य…

350
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०८: भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शिर कुर्म्याचे साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान येथील बांधवांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमात मी कायम सहभागी होईन, असा विश्वास यावेळी श्री. परब यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे अनेक बांधवाच्या घरी त्यांनी स्वतः हजेरी लावत त्यांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, अमित परब, केजत आजगावकर आदी उपस्थित होते.