कोनशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी दूषित…

278
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या; गटविकास अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष…

सावंतवाडी,ता.०३: कोनशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी दूषित असून त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत येथील स्थानिकांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. या समस्येबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून आपल्या स्तरावरून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी विनायक पिंगुळकर यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अर्जून सावंत, विठ्ठल गवस, अशोक सावंत, रामचंद्र गवस, लक्ष्मण गवस, चंद्रकांत सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.