सावंतवाडीत आज महायुतीची जाहीर सभा, राणेंसह पदाधिकारी उपस्थित राहणार…

228
2
Google search engine
Google search engine

केसरकर आपल्या होम ग्राउंडवर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष…

सावंतवाडी,ता.०५: लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज सावंतवाडी मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील गांधी चौक येथे दुपारी २ वाजता ही सभा होणार आहे. या सभेत राणेंसह शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी महायुतीकडून माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या सावंतवाडीतील सभेनंतर महायुतीच्या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. केसरकर त्यांच्या होम ग्राउंडवर होणाऱ्या सभेत काय बोलणार ? जनतेला काय आवाहन करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.