तिलारी नदीच्या पात्रात आढळलेल्या “त्या” मृतदेहाची अद्याप पर्यंत ओळख पटली नाही…

409
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग पोलिसांकडून शोध कार्य सुरू; नातेवाईकांची माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन…

बांदा,ता.१४: दोडामार्ग-मणेरी येथील तिलारी नदीच्या पात्रात ५ मे ला आढळून आलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख अद्याप पर्यंत पटली नाही. अज्ञात व्यक्तीने मृत तरुणाचा गळा दाबून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिलारी नदीपात्रात त्याचा मृतदेह फेकून दिले होतो.

संबंधित मृत तरुणाचे वय ३० ते ४० वर्षे असून डाव्या हाताच्या मनगटावर ‘रेणुका’ व उजव्या हाताच्या मनगटावर ‘बालाजी, लक्ष्मी, ज्योती’ असे गोंदलेले आहे. तसेच त्याच्या उजव्या हातामध्ये बेस्ट फ्रेंड असे लेबल असलेला आकाशी रंगाचा बँड आहे. या प्रकरणाबाबत दोडामार्ग पोलिसांकडून शोध कार्य सुरू असून संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ०२३६-२२८६१४, २२८२००० पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन दोडामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.