आसोली गावच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी कटीबद्ध…

73
2
Google search engine
Google search engine

विशाल परब; नारायण विद्यामंदिर शाळेचा शतक महोत्सव कार्यक्रम उत्साहात…

वेंगुर्ले,ता.१६: गावचा सर्वांगीण विकास हा खऱ्या अर्थाने गावात किती सोयी सुविधा उपलब्ध आहेत यावर अवलंबून असतो, गावात पायाभूत सुविधांचा असलेला अभाव दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असेन, ग्रामस्थांनी कोणत्याही समस्या असल्यास मला हक्काने सांगाव्यात, असा विश्वास युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला.

आसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १ या शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत शतक महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी, मेघशाम नाडकर्णी, भालचंद्र दीक्षित, सुनील मोरे, सदानंद गावडे, दिनकर नागवेकर, विश्वनाथ धुरी, सरपंच बाळा मधुकर जाधव, उदय धुरी, संजय गावडे, सुजाता देसाई, सुधीर आसोलकर, विजय धुरी, सुरेश धुरी, प्रसाद गावडे, प्रकाश रेगे, भास्कर केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.