अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू…

571
2
Google search engine
Google search engine

मुंबई-गोवा महामार्गावर जाणवली येथील घटना ; ग्रामस्थांचा रास्ता रोको…

कणकवली, ता. १७ : मुंबई-गोवा महामार्गावर जाणवली प्राथमिक शाळेसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान धडक देणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घ्यावे यासाठी जाणवली ग्रामस्थांनी रास्ता रोको सुरू केला आहे.
मुंबई व महामार्गावर जाणवली प्राथमिक शाळेसमोर चालत असलेल्या अनिल कृष्णा कदम (जाणवली, बौद्धवाडी) यांना वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत ते जागीच गतप्राण झाले. वाहनाची धडक एवढी भयानक होती की त्या वाहनाच्या पुढील बाजूस चा बंपर तुटून पडला. मयत कदम हे मजुरी चे काम करण्यासाठी जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. ज्या गाडीने धडक दिली ती कार प्रवाशांची वाहतूक करणारी पिवळी नंबर प्लेट असलेली आहे. ही कार गोव्याकडे भरधाव वेगाने गेलेले आहे. दरम्यान कदम यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच जाणवली ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. कदम यांना धडक देऊन पलायन करणाऱ्या वाहन चालकाला ताब्यात घ्यावे अशी त्यांची मागणी आहे.