भोसले नॉलेजसिटीत ३० मे ला इंजिनिअरिंग व फार्मसीवर मोफत मार्गदर्शन…

58
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२८: येथील भोसले नॉलेज सिटीत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमावर ३० मे ला सकाळी १० वाजता मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, आवश्यक कागदपत्रे, शासकीय शिष्यवृत्ती तसेच करिअर संधी याविषयी माहिती मिळावी या हेतूने या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र महत्वाचे असून यावेळी भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे व भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी ते भोसले नॉलेज सिटीपर्यंतची वाहतूक व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली आहे. हे सत्र पूर्णपणे मोफत असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.