दारू वाहतूक प्रकरणी गुजरात येथील एक ताब्यात…

260
2
Google search engine
Google search engine

बांदा पोलिसांची कारवाई; दारूसह गाडी मिळून १९ लाखाचा मुद्देमाल जप्त…

बांदा,ता.२९: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरण बांदा पोलीसांनी गुजरात येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ७ लाख २० हजाराच्या दारू ट्रक व मोबाइल असा एकूण १९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास इन्सुली चेक पोस्ट येथे करण्यात आली. इक्बाल जुमाभाई थेबा (वय २६, रा. जुनागड सिटी, गुजरात) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली तपासणी नाका येथे संशयित वाहनाची तपासणी करत असताना थेबा याच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूचे २०० बॉक्स आढळून आले. याप्रकरणी हे थेबा याला ताब्यात घेण्यात आले आहे. यात ७ लाख २० हजाराच्या दारूसह १२ लाखाचा ट्रक व ५ हजाराचा मोबाईल असा १९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस कॅन्सटेबल प्रथमेश पोवार, रोहित कांबळे आदींनी केले.