पत्रादेवी तपासणी नाक्यात थेट उभा असलेला कंटेनर घुसला…

737
2
Google search engine
Google search engine

सुदैवाने कोणीही जखमी नाही; हॅन्डब्रेक न लागल्यामुळे प्रकार घडल्याचे म्हणणे…

बांदा,ता.०२: तपासणीसाठी उभा असलेला कंटेनर थेट आरटीओ कार्यालयात घुसल्याची घटना पत्रादेवी येथे घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र यात नाक्यासह दुचाकी आणि बाजूला असलेल्या मोटारीचे मात्र नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी घडली. गाडीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी संबधित कंटेनर चालक गाडी उभी करुन निघून गेला, मात्र तत्पुर्वी त्याने हॅन्डब्रेक लावला नसल्यामुळे हा अपघात घडला असे तेथिल अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.