सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी आता चित्रकलेच्या माध्यमातून करीयरच्या वाटा शोधाव्यात…

177
2
Google search engine
Google search engine

राजन तेली; देवरूख कॉलेज व अस्मसा अ‍ॅकेडमी आयोजित प्रशिक्षण शिबीरात आवाहन…

सावंतवाडी,ता.०२: तब्बल १३ वर्षे दहावी-बारावीच्या बोर्डात यश संपादन करणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी चित्रकलेच्या माध्यमातून करीयरच्या नव्या संधी शोधाव्यात. वेगळे काहीतरी करण्याची आणि शिकण्याची उमेद असलेल्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे, असे आवाहन भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले.

पेंटिंगच्या माध्यमातून मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत. एक पेंटिंग एक ते दिड लाखा पासून कोट्यावधी रुपया पर्यंत पैसा मिळवून देवू शकते. त्यामुळे त्या दृष्टीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा असे ते म्हणाले. देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अ‍ॅण्ड डीझाईन रत्नागिरी आणि अस्मसा गुरूकुल आर्ट गॅलरी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. तेली यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबीराच्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी श्री. तेली म्हणाले तुमच्या चित्रकला फिल्ड बद्दल मला जास्त काही माहिती नाही, परंतू एखाद्या सुंदर चित्रामुळे कलाकाराला महत्व मिळते आणि पैसाही मिळतो. याचा फायदा वेगळे करीयर आणि ओळख घडविण्यासाठी होवू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने शिक्षण घेण्यासाठी मुलांनी प्रयत्न करावेत. यावेळी श्री. जगताप म्हणाले चित्रकला क्षेत्रात मोठी जादू आहे. परंतू ती कला आत्मसात करण्यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आपण आपला प्रवास सुुरू ठेवल्यास त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो. चित्रकाराने चित्राबरोबर आपला स्टुडीओ काढला काही नवोदित कलाकारांना प्रशिक्षण दिले तरिही रोजगार निर्माण होवू शकतो. यावेळी श्री. मराठे म्हणाले, कोकणातील मुलांना चित्रकलेचे धडे मिळावेत यासाठी आम्ही देवरूख कॉलेजच्या माध्यमातून चित्रकलेबाबत जनजागृती करण्याचे काम करीत आहोत त्यामुळे पुढच्या पिढीने या फील्डच्या माध्यमातून आपल्या करीयरच्या नव्या वाटा शोधाव्यात, यात नक्कीच यश आहे.

यावेळी