आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा…

232
2
Google search engine
Google search engine

शरद पवारांच्या सूचना; भोसले, घारेंनी घेतली मुंबईत भेट…

सावंतवाडी,ता.१०: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी आज राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामाला लागावे, अशा सूचना यावेळी श्री. पवार यांनी केल्या. आज मुंबई येथे या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी संदीप घारे उपस्थित होते.