सिंधुदुर्गात १९ जून पासून पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी परिक्षा……

205
2
Google search engine
Google search engine

पोलीस अधीक्षकांची माहिती; १४२ पदांसाठी ८ हजार ४२ अर्ज…

सिंधुदुर्गनगरी,ता.१२: जिल्ह्याच्या पोलीस दलात रिक्त असलेल्या १४२ जागांसाठी ८ हजार ४२ अर्ज दाखल झाले आहेत. या भरती प्रक्रियेतील मैदानी परीक्षा १९ जून पासून पोलीस दलाच्या सिंधुदुर्गनगरी येथील परेड मैदानावर होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
डिसेंबर २०२३ अखेर रिक्त असलेल्या पोलीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये ११८ शिपाई पदांचा समावेश असून २४ चालक पदांचा समावेश आहे. शिपाई पदांमध्ये पाच जागा बँड पथकाच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने ५ मार्च २०२३ पासून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जातील छाननी करून शिपाई पदांसाठी ५ हजार ९२० अर्ज पात्र ठरले आहेत. तर चालक पदांसाठी एक हजार ३३९ अर्ज पात्र ठरले आहेत. एकूण ८ हजार ४२ अर्ज पात्र ठरले आहेत, असे यावेळी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले.
मैदानी परीक्षा १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलीस परेड मैदानावर होणार आहे. यामध्ये पुरुषांसाठी उंची, छाती, १६०० मीटर धावणे, गोळा फेक, १०० मीटर धावणे. महिला उमेदवारांसाठी उंची, १०० मिटर धावणे, ८०० मिटर धावणे, गोळा फेक आदी परीक्षा घेतली जाणार आहे.