“सिंगल युज” प्लास्टिक पिशव्या वापरल्या प्रकरणी कणकवलीत २६ हजारांचा दंड…

166
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.१२: कणकवली नगरपंचायत पथकाने “सिंगल युज” प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कारवाई करत तब्बल २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गेले काही दिवस मंगळवार आठवडा बाजारा दिवशी मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सातत्याने कारवाई सुरू आहे. नुकत्याच केलेल्या कारवाई मध्ये प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, आरोग्य लिपिक सतिश कांबळे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, ध्वजा उचले, राजेश राणे, निकिता पाटकर, रुचित ताम्हणकर, माधुरी डगरे, ज्योती देऊलकर व इतर नगरपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी प्लास्टिक पिशव्या जप्त करत दंड वसूल करण्यात आला.