बांदा-बळवंतनगर येथील “तो” विजेचा खांब अखेर सरळ…

64
2
Google search engine
Google search engine

ब्रेकिंग मालवणीच्या वृत्ताची दखल; २४ तासाच्या आत विज कंपनीची कार्यवाही…

बांदा,ता.१५: येथील बळवंतनगर परिसरात असलेला “तो” धोकादायक वीजेचा खांब विज कार्यालयाकडून सरळ करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त काल ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर विज अधिकार्‍यांनी तात्काळ दखल घेवून या कामाला सुरुवात केली आहे. तात्काळ दखल घेतली गेल्यामुळे विज वितरणच्या अधिकार्‍यांच्या जागरुकीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. “तो” खांब धोकादायक असल्याची तक्रार तेथील काही नागरिकांनी केली होती. याबाबतचे वृत्त ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून काल प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर २४ तासाच्या आत दखल घेवून तो खांब आज सरळ करण्यात आला.