भटवाडी येथील ६ नंबर शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत…

61
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१५: भटवाडी येथील कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव जि. प. शाळा नं. ६ मध्ये आज नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना नवीन पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सौ. भालेकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या अध्यक्षा अनिशा राणे, उपाध्यक्षा समीक्षा खोचरे, शिक्षणतज्ञ दिलीप भालेकर, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव, सहाय्यक शिक्षिका सायली लांबर, पालक ईश्वरी तेजम, तुयेकर, बालवाडी शिक्षिका दर्शना गावडे, अश्विनी गावडे, दीपा गावडे आदी उपस्थित होते.