आंबोली अपघातातील गोकाक येथील दुसऱ्या जखमीचेही निधन…

1212
2
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.१८: येथील नांगरतास परिसरात दुचाकी व बोलेरो टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोकाक येथील दुसऱ्याही युवकाचे निधन झाले आहे. तय्यब सुलतानसाब पानारी (वय १९) असे त्याचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास नांगरतास परिसरात आंबोली-बेळगाव मार्गावर घडला होता. यात दुचाकी चालक असलेला त्याचा मित्र सादिक इम्तियाज मुल्ला (वय १९, रा. गोकाक) हा जागीच ठार झाला होता तर तय्यब हा गंभीर जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात महिंद्रा बोलेरो चालक मोहम्मद जान मोहम्मद सईद (वय ३४, रा. एरंडोल, जिल्हा- बेळगाव, सध्या रा. गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस हवालदार आबा पिरणकर यांनी दिली.