भेडले माडाची पाने तोडल्या प्रकरणी दोघांना २ दिवसांची वन कोठडी…

953
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.१९: मातोंड येथील शासकीय वनात भेडले माडाची पाने तोडल्याप्रकरणी वनविभागाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २ दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. बाबत लाडू परब (वय ४९) व प्रकाश लाडू जाधव (वय ५५, दोघे रा. तळवडे) अशी त्यांची नावे आहेत.
काल त्यांना मातोंड येथे भेडले माडाची पाने तोडताना रंग हात ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून एक रिक्षा, पाळ व कोयता आदी हत्यारे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांच्यावर वनअधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता २ दिवसाची वनकोठडी देण्यात आली आहे.