मारहाण प्रकरणी “त्या” ११ ही जणांची जामीनावर मुक्तता…

708
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१९: आर्थिक फसवणूक केल्याच्या रागातून इन्सुलीच्या घाटात तिघांना विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ११ जणांची आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ हजाराच्या जामीनवर मुक्तता करण्यात आली. यातील २ संशयित हे अद्यापही आजारी असल्यामुळे ते कुटीर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याकामी अँड. अनिल निरवडेकर राघू नार्वेकर व अनिल केसरकर यांनी काम पाहिले.
याबाबतची तक्रार दिपेश गणपत वरसगावकर (वय ४०, रा. सालईवाडा, मुळ रा. नेरुर-देऊळवाडी) याने दिली होती.यात त्याच्यासह योगेश आडणेकर (रा. कोलगाव) व मकरंद कुलकर्णी या तिघांना मारहाण करण्यात आली. त्यानुसार हेमंत सत्यवान वागळे (वय २९), विलास दत्तात्रय पोपकर (वय ५१), वृषाल विलास पोपकर (वय २२, तिघे रा. इन्सुली), अनिकेत अरुण परब (वय ३१), अरुण धोंडू परब (वय ५८, दोघे रा.चराठा), अनिकेत गुरुनाथ राऊळ (वय २३, रा. मळगाव), शुभम शिवप्रसाद शितोळे (वय २६, रा. सबनिसवाडा- सावंतवाडी), भिवा लक्ष्मण मुळीक (वय ३२), यशवंत भानुदास नार्वेकर (वय ४२), रामचंद्र लवू नाईक (वय ३१, रा.इन्सुली) संदीप उर्फ बाबू नारायण गावडे वय ३६ रा निगुडे  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यातील दहा जणांना अटक करण्यात आली होती. आज यातील ९ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांची १५ हजाराच्या जामीन मुक्तता करण्यात आली. तर अनिकेत परब व यशवंत भानुदास नार्वेकर हे दोघे कुटीर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या दोघांना नोटीस बजावण्यात आली.