मांगेली येथे शिक्षकांसाठी शाळा बंद आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा

2

 

दोडामार्ग, ता.२९: मांगेली-तळेवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी तात्काळ शिक्षक उपलब्ध करून द्या अन्यथा मंगळवारपासून शाळा बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज गाव व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सरपंच सूर्यनारायण गवस यांच्याकडून देण्यात आला आहे. शाळा व गाव व्यवस्थापन समितीची बैठक आज येथे झाली.
या बैठकीत मांगेली जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवी पर्यंत ५६ विद्यार्थी आहेत.मात्र दोनच शिक्षक याठिकाणी देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांच्यावर अतिरिक्त भार पडतो तसेच २ शिक्षक असल्यामुळे सर्व विषयाची उजळणी घेणे शक्य होत नाही.त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता तात्काळ शाळेत आणखी दोन शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत,अशी मागणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.दरम्यान या बाबतची तात्काळ कार्यवाही न झाल्यास येत्या मंगळवार पासून गावातील ग्रामस्थांकडून शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

22

4