ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात सावरवाड येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

163
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१९: पावसाळी शेतीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकऱ्यांना पिकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस-ओरोस येथील विद्यार्थ्यांनी सावरवाड-कुडतरकरटेंब येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आयोजित करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यता प्राप्त असलेल्या छत्रपती कृषी विद्यापीठाचे अथर्व मठकर, लक्षदीप शेटकर, श्रीनिवास वाळके, ऋत्विक तेली व केरळ येथील दोन विद्यार्थी अनिरुद्ध पी, अरुणदेव सी.पी आदी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शेतीपूरक बियाणी, नवनवीन तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची दखल घेत उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सावरवाड सरपंच देवयानी पवार, उपसरपंच अनिकेत म्हाडगूत, रेषा तेली आदी उपस्थित होते.