पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर ३०० झाडांची लागवड…

30
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.१९: पुरोगामी महाराष्ट्र शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षरोपण करण्यात आले. यात पहिल्या टप्प्यात ३०० सुरु, वड व पिंपळाची झाडे लावण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने वाढती ग्लोबल वार्मिंगची समस्या लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात जगप्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर समुद्रकिनारी वृक्षारोपण करून करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी गवळी, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, अभिजीत मदने, कुणकेश्वर ग्रामसेवक गुणवंत पाटील, केंद्रप्रमुख तथा जिल्हा नेते अशोक जाधव, स्नेहा पारकर, आनंद जाधव, संगीता जाधव, प्रकाश वाडकर खराडे, धर्मराज धुरत, मधुसूदन घोडे, देवीदास माने, उपसरपंच शशिकांत लब्दे, ग्रा प सदस्य ,संजय आचरेकर, एकनाथ तेली, डॉ मांडवकर, महेश तेली, भास्कर पेडणेकर, सुजित बोंडाळे, विलास लोके, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.