युवा संदेश प्रतिष्‍ठानच्या वतीने सिंधुदुर्गातील १५ विद्यार्थी इस्त्रो भेटीला…

100
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१९ : सिंधुरत्‍न टॅलेंट सर्च परीक्षेतील १५ गुणवंत विद्यार्थी भरतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)च्या भेटीसाठी विमानातून रवाना झाले. युवा संदेश प्रतिष्‍ठानच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. युवासंदेश प्रतिष्‍ठानचे अध्यक्ष संदेश सावंत, जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत यांनी या सर्व विद्यार्थ्यांना इस्त्रो अभ्यास सहलीसाठी शुभेच्छा दिल्‍या.

युवा संदेश प्रतिष्‍ठानच्यावतीने चौथी, सहावी आणि सातवी इयत्तेमधील विद्यार्थ्यांसाठी सिंधुरत्‍न टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. या प्रत्‍येक इयत्तेमधील प्रथम पाच अशा एकूण १५ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्‍हणून १८ ते २१ जून या कालावधीत विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे सहल घडवून आणण्यात येत आहे. या सहलीमध्ये विक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र, कनकाकुन्नु पॅलेस, श्री पद्मनाभस्वामी मंदिर, नेपियर म्युजियम, त्रिवेंद्रम झू आदी स्थळांना भेटी दिल्‍या जाणार आहेत. युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या सहलीमध्ये आराध्या नाईक (कोनाळकट्टा, दोडामार्ग), दुर्वा प्रभू (कुडाळ), अर्णव भिसे (हरकुळ खुर्द), ओम वाळके (कुडाळ), शौर्य नाचणे (कणकवली), आदित्‍य प्रभुगावकर (मालवण), कर्तव्य बांदिवडेकर (सावंतवाडी), रेवन राहुल (खारेपाटण), वेद जोशी (पडेल), आर्या गावकर (साळशी), शौनक जातेकर (कणकवली), यशश्री ताम्‍हाणकर (मसुरे), मयंक चव्हाण (कणकवली), पारस दळवी (सांगेली), सोहम कोरगावकर (सावंतवाडी) यांचा समावेश आहे.