सिंधुदुर्गात प्रथमच १४ जूलैला मान्सून मॅरेथॉन स्पर्धा…

107
2
Google search engine
Google search engine

डॉ. जी. टी. राणेंंची माहिती; जिल्ह्यातून पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी होणार…

कुडाळ,ता.१९: आरोग्यासाठी चालणे किंवा धावणे महत्वाचे आहे, असा संदेश देणारी मान्सून मॅरेथॉन स्पर्धा सिंधुदुर्गात प्रथमच १४ जूलैला कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

राणे हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर आणि टिम कुडाळ मॉन्सून रन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. जी. टी. राणे यांनी दिली. यावेळी डॉ. अजित राणे, जयेंद्र रावराणे, प्रशांत सामंत, रुपेश तेली, गजानन कांदळगावकर, दिनेश आजगावकर, रंजन बोभाटे, शिवप्रसाद राणे, अमित तेंडुलकर आदी उपस्थित होते.