आदर्श सेवाकार्यातुन नावलौकिक प्राप्त करा…

256
2
Google search engine
Google search engine

संजय माने : मालवण तालुक्यातील नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत…

मालवण, ता. १९ : शिक्षकी पेशाला समाजात फार मोठे स्थान आहे. शिक्षण व संस्कारातून विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांनी आदर्श सेवाकार्यातुन नावलौकिक प्राप्त करावा असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी केले.
शासनाच्या शिक्षक भरतीतून तालुक्यातील नवनियुक्त ८८ शिक्षकांचे स्वागत तसेच मार्गदर्शन कार्यशाळा पंचायत समिती शिक्षण विभाग रघुनाथ देसाई सभागृह येथे झाली. नवनियुक्त शिक्षकांचा शालार्थ आयडी जनरेट करणे तसेच सेवा पुस्तकात नोंद करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तंत्रस्नेही शिक्षक भागवत अवचार, कृष्णा कालकुंद्रीकर, राजेंद्रप्रसाद गाड, विनीत देशपांडे, नवनाथ भोळे, दिनकर शिवलकर, गुरुनाथ ताम्हणकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरी नार्वेकर यांनी केले. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एकूण नविन ८८ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. यात उपशिक्षक मराठी ६३, उपशिक्षक उर्दू १, पदवीधर भाषा १२, पदवीधर विज्ञान १२ असे शिक्षक नियुक्त झाले आहेत. या सर्वांचे स्वागत यावेळी गटशिक्षणाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले.
शिक्षकपेक्षा ही सेवा आहे. संस्कार कर्तव्यातून भावी पिढी घडवत असताना शिक्षकी पेशाचे पावित्र्य प्रत्येकाने जपले पाहिजे. शासन नियमांचे पालन करत प्रत्येकाचे सेवकार्य आदर्शवत असावे. ज्ञान शिक्षणाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर आहे. प्रत्येक चांगल्या कार्याचा येथे सन्मान होतो गौरव होतो. येथील शिक्षक संघटनाही चांगले काम करत असून त्यांचेही सहकार्य नेहमीच लाभते असेही गटशिक्षणाधिकारी श्री. माने म्हणाले.
गेल्या काही वर्षात रिक्त शिक्षक पदांमुळे अनेक अडचणी होत्या. मात्र आता बहुतांश शिक्षक प्राप्त झाले आहेत. या माध्यमातून दर्जेदार शिक्षण विद्यार्थी वर्गाला देत असताना स्पर्धात्मक युगात टिकणारे विद्यार्थी निर्माण व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी शिक्षण विभाग विशेष प्रयत्नशील असल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.