डास निर्मूलन मोहिम राबवा, अन्यथा कार्यालयात मच्छर अगरबत्ती लावू…

88
2
Google search engine
Google search engine

देव्या सुर्याजींचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा; डासांकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप…

सावंतवाडी,ता.२०: शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तात्काळ डास निर्मूलन मोहिम राबवा, अन्यथा मुख्याधिकारी कार्यालयात जाऊन १ हजार मच्छर अगरबत्ती लावू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी दिला आहे.शहरात गेले अनेक दिवस डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. सूर्याजी यांनी हा इशारा दिला आहे.