“टी-५५” रणगाड्याचे आता शौर्य स्मारकात रूपांतर होणार…

278
2
Google search engine
Google search engine

२२ जूनला लोकार्पण; परमवीर चक्र सुभेदार योगेंद्र सिंगांची प्रमुख उपस्थिती…

कुडाळ/निलेश जोशी, ता.२०: देशासाठी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात रणभूमी गाजवणाऱ्या “टी-५५” या रणगाड्याचे आता सिंधुदुर्गात कुडाळ येथे शौर्य स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २२ जूनला दुपारी साडेतीन वाजता कुडाळ एमआयडीसी येथे होणार आहे. यावेळी कारगिल युद्धात पराक्रम गाजविणारे परमवीर चक्र विजेते सुभेदार योगेंद्र सिंग यादव यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. हा रणगाडा बॅ. नाथ प्रशिक्षण संस्थेला प्राप्त झाला होता. त्याच्या माध्यमातून आता शौर्याच्या आठवणी जपल्या जाणार आहेत.

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेला प्राप्त झालेल्या टी-५५ या रणगाड्याला पराक्रमाचा इतिहास लाभला आहे. या रणगाड्याच्या बाबतीत घडून आलेला योगायोग ही पराक्रमाचा बाब आहे .१९६० ते ७० च्या दशकात अत्याधुनिक आणि घातक या व्याख्येत बसणाऱ्या या रणगाड्याला १९६५ आणि १९७१ या दोन युद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊन पराक्रम गाजवण्याची संधी मिळाली होती. योगायोग हा की १९६५ च्या युद्धात लेफ्टनंट कर्नल एव्हिल लारापोर यांच्या नेतृत्वाखाली या रणगाड्याने पठाणकोट परिसरात पाकिस्तान सैन्यावर घातक हल्ला चढवला होता व शत्रूला पळवून लावले होते .या युद्धात कर्नल लारारोप यांना त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाबद्दल परमवीर चक्र प्राप्त झाले होते तर १९७१ च्या याच युद्धात रणगाड्याने अखनूर रेक्टर मध्ये पाकिस्तानी सैन्यावर प्रतिहल्ला चढवत पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली होती .या १९७१ च्या युद्धात ज्यांच्या नेतृत्वाखाली हा रणगाडा शत्रू सैन्यावर तुटून पडला होता. ते लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांनाही त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाबद्दल अतिउच्च शौर्याचे परमवीरचक्र प्राप्त झाले होते, आणि आता लष्करी सेवेतून मुक्त झालेल्या या रणगाड्याच्या शौर्य स्मारकाचे उद्घाटन ज्यांच्या हातून होत आहे ते सुभेदार योगेंद्रसिंह यादव हे देखील परमवीर चक्र विजते कारगिल युद्धातील महापराक्रमी योद्धा आहेत. हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल.

तीन परमवीरचक्र विजेत्यांचा सहवास लाभलेला हा रणगाडा बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेला आणि पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त व्हावा यासारखी भाग्याची अन्य दुसरी गोष्ट ती कुठली? तरी देशप्रेमी नागरिकांनी व रसिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.