अंमली पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवा…

88
2
Google search engine
Google search engine

प्रवीण कोल्हे ; मसुरेत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिन साजरा…

मालवण, ता. २४ : अंमली पदार्थांचे व्यसन हा एक असा आजार आहे जो तरुण पिढीवर सतत परिणाम करत आहे. तरुणांचा मोठा वर्ग दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यांसारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची वेळीच माहिती असणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध दरवर्षी २६ जून हा दिवस अंमली पदार्थांच्या दुरुपयोगमुक्त जगासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मसुरे येथे केले.
आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त आर. पी. बागवे हायस्कुल आणि एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालय मसुरे येथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम झाला. यावेळी मुख्याध्यापक अर्चना कोदे, सहायक शिक्षक रमेश पाताडे, सुनील बांदेकर, शशांक पिंगुळकर, एन. एस. जाधव, श्री. घाटे, भरत ठाकूर, मसुरे पोलीस कर्मचारी विवेक फरांदे, कैलास ढोले, सोनाली कोदे, विशाखा जाधव, आर्या भोगले, समीर नाईक, दयानंद पेडणेकर, भानुदास परब, अनिल मेस्त्री, चरणदास फुकट आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत रमेश पाताडे यांनी केले. भरत ठाकूर यांनी आभार मानले.