दाखले देण्याचे काम सोडून तहसिलदार मायनिंंग क्वारीवाल्यांच्या बैठकीत…

684
2
Google search engine
Google search engine

आशिष सुभेदार; नाहक आरोप नको, आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय, श्रीधर पाटील…

सावंतवाडी,ता.२४: सर्वसामान्यांची कामे आणि विद्यार्थ्यांना दाखले देण्याचे काम सोडून सावंतवाडीचे तहसिलदार मायनिंग आणि क्वॉरीवाल्यांच्या बैठकीत व्यस्थ होते. त्यामुळे सर्वसामांन्य नागरीक कार्यालयात ताटकळत उभे होते, असा आरोप उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी केला आहे. दरम्यान लोकांची कामे सोडुन जर मायनिंगवाल्यांच्या भेटी-गाठी तहसिलदार घेत असतील तर ते नेमके कोणासाठी काम करीत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकाराची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

याबाबत श्री. सुभेदार यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. दरम्यान याबाबत तहसिलदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आज सोमवार असल्यामुळे लाईट नव्हती त्यामुळे सर्व संगणक बंद होते. अशा अवस्थेत आम्ही मोबाईलवरुन अनेकांना दाखले दिले. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. त्या ठिकाणी कोणाचीही बैठक झाली नाही, ते कार्यालयात आले असते तर त्यांनी चिठ्ठी पाठविणे गरजेचे होते. मात्र असे चुकीचे आरोप करू नयेत, आम्ही आमचे शासकीय काम प्रामाणिकपणे करीत आहोत.