मुलाकडून वडिलांवर सुऱ्याने प्राणघातक हल्ला….

734
2
Google search engine
Google search engine

जामसंडे येथील घटना; कुत्र्याला खायला आणायला सांगितल्याने वाद…

देवगड,ता.२४: कुत्र्याला खाद्य आणण्यासाठी सांगितल्या रागातून मुलाने वडीलांवर सुऱ्याने हल्ला केल्याचा प्रकार जामसंडे सहकारनगर येथे घडला आहे. यात वडील रविकांत पारकर (वय ६४) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा करण पारकर (वय ३१) याच्यावर देवगड पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे-सहकारनगर येथे राहत असलेल्या रविकांत रघुनाथ पारकर यांचा लहान मुलगा करण पारकर यांने कुत्र्यांना खाण्यासाठी कोंबडीचे पाय आणायचे आहेत ते घेऊन ये असे मोठा भाऊ सिद्धार्थ याला सांगितले. परंतु त्यांने ते संध्याकाळी घेऊन येतो, असे सांगितल्यावर त्याचा राग येऊन करण याने घरातील सर्वांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. व वडील रविकांत पारकर यांना हाताच्या थापटाने मारून नंतर घरातील मासे कापण्याचा सुरा घेऊन त्याने डाव्या हातावर व पाठीवर वार करून जखमी केले. या प्रकरणी रविकांत पारकर यांनी देवगड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी करण पारकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करीत आहेत.