इन्सुली येथे ख्रिस्ती बांधवांकडून “सांन्जाव” उत्साहात साजरा…

341
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२५: इन्सुली येथील ख्रिस्ती बांधवांनी “सांन्जाव” सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी भर पावसात डोक्यावर रंगीत फुलाचे मुकुट घालून तसेच रंगीबेरंगी कपडे घालून त्यांनी मौजमजा केली. दरवर्षीप्रमाणे ख्रिस्ती संत जॉन बाप्तीस यांचा जन्मदिवस सांन्जाव म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ख्रिस्ती बांधव आनंदाने हा सण साजरा करतात. यावेळी विहिरीत उडी मारणे, चिखल अंगावर लावणे आणि मौजमजा करणे असा कार्यक्रम केला जातो. या मौजमजेत आबालवृद्ध सहभागी होतात.