ग्रामीण भागातील शाळांमधील निकालाची उज्वल परंपरा कौतुकास्पद…

49
2
Google search engine
Google search engine

विनायक कारभाटकर; अणसूर-पाल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात…

वेंगुर्ले,ता.२५: प्रामाणिक निष्ठा व कठोर मेहनतीने मिळविलेले यश हे सर्वोत्तम यश असून ते जीवनात अखंड टिकते. ग्रामीण भागातील शाळांची १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मिळविलेले सर्वोत्तम गुण कौतुकासपद व अभिनंदनीय आहेत, असे गौरवोद्गार उद्योजक विनायक कारभाटकर यांनी काढले. अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने अणसूर-पाल हायस्कूलमधील एस. एस. सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मया-गोवा येथील उद्योजक विनायक कारभाटकर, संस्था अध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, देवू गावडे, विजय गावडे, गुंडू गावडे, भाऊ गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, जनशिक्षण संस्थेचे गजानन गावडे, माजी मुख्याध्यापक शैलजा वेटे, सेवानिवृत्त लिपिक सुधीर पालकर, रूचिरा पालकर, वासुदेव बर्वे, नारायण ताम्हणकर, बिटू गावडे, अनंत मांजरेकर, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवर आत्माराम गावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन भावी जीवनात आपल्या आवडत्या क्षेत्रात सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. लिलाधर गावडे यांनी शैक्षणिक विकासासाठी संस्था करीत असलेल्या प्रयत्नांत सर्व माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या भरीव सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. एम.जी.मातोंडकर यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी तत्पर रहावे व आपला विकास साधण्यासाठी मेहनत घ्यावी असे प्रतिपादन केले. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, सरपंच कावेरी गावडे, भाऊ गावडे, गुंडू गावडे यांनीही विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेच्यावतीने वेंगुर्ला तालुक्यात आठवा आलेल्या व शाळेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या मंदार नाईक, द्वितीय यज्ञेश गावडे व तृतीय भुमिका राऊळ यांचा सॅकबॅग तसेच इतर साहित्य देऊ गौरव केला. यावेळी संस्थेच्यावतीने उपस्थित सर्व शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जीवन विद्या मिशन पुस्तिके भेट दिली. सेवानिवृत्त लिपिक सुधीर पालकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्यावतीने बुद्धमूर्ती व साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. सुधीर पालकर यांनी संस्था व शालेय परिवाराचे आभार मानून, संस्थेला पंचवीस हजार रूपयांचा धनादेश दिला तर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वॉटरबॉटल भेट दिली.