बांदा मराठा समाजाच्या वतीने ३० जून ला गुणगौरव सोहळा…

17
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२७: येथील मराठा समाजातर्फे दशक्रोशीतील मराठा समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदवीका व इतर विषयात प्रविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ३० जुनला बांदा ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, मराठा समाज बांदा समन्वयक मकरंद तोरसकर, मराठा समाजातील यशस्वी उद्योजक आनंद गवस, बांदा मराठा समाज माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, बांदा मराठा समाज माजी संस्थापक अध्यक्ष निलेश मोरजकर, बांदा मराठा समाजाचे विद्यमान अध्यक्ष विराज परब, बांदा मराठा समाज महिला अध्यक्ष सौ. स्वाती सावंत, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठा सामाज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना भेट वस्तू, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब यांनी केले आहे.