सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कुबा ड्रायविंग व आंतरराष्ट्रीय जिल्हा उद्योग केंद्र…

530
2
Google search engine
Google search engine

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद; पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लेत होणार…

मुंबई,ता.२८: राज्य शासनाकडून आज जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून देण्यात आले आहे. यात वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्प, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्कुबा ड्रायविंग प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा उद्योग केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
आज राज्याचा अर्थसंकल्प अहवाल राज्याचे अर्थ मंत्री अजित पवार यांनी सभागृहात सादर केला. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरपूर देण्यात आले आहे. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला पानबुडी प्रकल्प गुजरात मध्ये नेल्याचा आरोप मध्यंतरीच्या काळात झाला होता. मात्र नव्याने सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हा प्रकल्प पुन्हा एकदा वेंगुर्ल्यात उभारण्यात येणार असल्याचे आता अंतिम झाले आहे. त्यामुळे याचा फायदा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसह विशेषता पर्यटनाला होणार आहे. येत्या चार ते पाच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देण्यात आलेले हे नवे प्रकल्प फायद्याचे ठरणार आहे. मात्र ते नेमके कधी आणि केव्हापर्यंत मार्गी लागतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.