कणकवलीतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव…

95
2
Google search engine
Google search engine

जिल्‍हा पोलीस अधीक्षकांच्याहस्ते प्रशंसापत्र प्रदान…

कणकवली,ता.२८: कणकवली तालुक्‍यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज जिल्‍हा पोलीस अधीक्षकांच्याहस्ते गौरव करण्यात आला. विविध गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये चांगली कामगिरी बजावलेल्‍या या कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांच्यास्ते त्‍यांच्या कार्यालयात प्रशंसापत्र देण्यात आले. प्रशंसापत्र देण्यात आलेल्‍या अधिकाऱ्यांमध्ये कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्‍याम आढाव, पोलीस निरीक्षक समशेर तडवी, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेडगे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पोलीस नाईक रूपेश गुरव, उद्धव साबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे, विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल यु.बी.कदम, नितीन बनसोडे, महेश फाळके, भूषण सुतार, पांडूरंग कळंत्रे, मनीष पावरा, प्रणाली जाधव यांचा समावेश आहे.