अवैध वाहतूक रोखण्यासाठी दिवस-रात्र संयुक्त मोहीम राबवा… 

72
2
Google search engine
Google search engine

साई कल्याणकर; डंपर चालक व पोलिसांच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी…

सावंतवाडी ता.३०: बेकायदा गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाई करताना पोलिस आरटीओ आणी जीएसटी अधिकारी अशी मिळुन दिवसरात्र संयुक्त मोहीम राबवावी ,अशी मागणी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.

या ठिकाणी नाक्यावर थांबलेल्या पोलिसांना डंपर चालक शिट्टी वाजवून सुद्धा थांबत नाही. हे आपण प्रत्यक्ष बघितले आहे. त्यामुळे ‘खाकीला’ डंपर चालक किंमत देत नाही. हा प्रकार योग्य नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. श्री. कल्याणकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, बेकायदा वाहतुकीचा विरोधात बांदा पोलीस स्टेशनवर उपोषण केले होते. यावेळी कारवाई करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक बडवे यांनी आपण तपासणीसाठी आवश्यक असलेली पोलीस कुमक देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. तहसीलदार, महसूल प्रशासनातील काही कर्मचारी घेवून एकटेच कारवाई करत आहेत. त्यामुळे अवैध वाहतूक सुरूच आहे. हा प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आरटीओ आणि जीएसटी ऑफिसर यांना सोबत घेऊन संयुक्त मोहीम राबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.