सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०६: आज सकाळी ८ वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पाताळी पुढीलप्रमाणे आहे.  तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३८.४०० मी. आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मीटर व धोका पातळी ४३.६०० मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ ४.००० मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी  ९.९१० मीटर आणि धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी २.३०० मीटर इतकी असून इशारापातळी ८.५०० मीटर व धोका पातळी १०.५०० मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

\