रोटरी क्लबच्या माध्यमातून मडुरेतील वस्तीगृहात धान्य व पुस्तके वाटप…  

38
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.३०: सावंतवाडी येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून मडुरे-रोणापाल येथील दयासागर या वस्तीगृहाला धान्य व पुस्तके वाटप करण्यात आली. रोटरीच्या मावळत्या कार्य करण्याची सांगता लवकरच होणार आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विनया बाड यांनी मुलींना मार्गदर्शन केले, तसेच सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुहास सातोसकर, सचिव प्रवीण परब, दिलीप म्हापसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुंदर हस्ताक्षर आणि उत्तम चित्रकला काढणाऱ्या देवेश गवस या विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले.