उमंग करिअर मार्गदर्शन मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील “टॅलेंटला” विविध क्षेत्राची ओळख…

75
2
Google search engine
Google search engine

सौरभ कुमार अग्रवाल; विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा भविष्यात लाभ करून घ्यावा…

कुडाळ,ता.३०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्यात आलेला उमंग करियर मार्गदर्शन मेळावा हा उपक्रम ग्रामीण भागातील “टॅलेंटला” विविध क्षेत्राची ओळख करुन देणारा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा भविष्यात पुरेपूर लाभ करून घ्यावा, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले.

कुडाळ येथील सिध्दिविनायक हाॅल येथे एमकेसीएल, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व सिंधुसंकल्प अकादमी कुडाळ आयोजित उमंग करिअर मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रोपट्याला पाणी घालून या मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासीर बोरसादवाला, नामवंत डाॅक्टर अमेय देसाई, एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष दिनेश आजगावकर, सेक्रेटरी डाॅ. संजय केसरे, असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे, संजय पुनाळेकर, सचिन गावडे, गजानन कांदळगावकर, रोटरी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष ॲड. राजीव बिले, नीता गोवेकर, शशिकांत चव्हाण, सचिन मदने, अभिषेक माने, संजय पिंगुळकर, एकनाथ पिंगुळकर, अमित वळंजू, डाॅ. संजय सावंत, सिंधुसंकल्प अकादमीचे केदार देसाई, भूषण तेजम, सावन जळवी, तेजस पिंगुळकर, प्रीती नेमळेकर आणि अयोध्या नाटकातील कलाकार तसेच एम के सी एल रिजनल मॅनेजर तुषार निकम , मंगेश जाधव, सारथीचे श्री. पाटील व उमेश निकम, सौ सई तेली, का.आ.सामंत ,प्रणाली मयेकर, डाॅ.विद्याधर तायशेट्ये, कुडाळ हायस्कूल प्राचार्य दिनेश आजगावकर विघ्नेश खांडेकर, स्नेहल गावडे आदी उपस्थित होते.