रिक्षा संघटनेने बुजविले बांदा-पत्रादेवी रस्त्यावरील खड्डे…

118
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.३०: येथील बांदा-पत्रादेवी मार्गावर पडलेले खड्डे आज बांदेश्वर मंदिर रिक्षा संघटनेने श्रमदानातून बुजविले. यासाठी एक दिवस रिक्षा बंद ठेवून भर पावसात भिजत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वारंवार कल्पना देऊन सुद्धा हे खड्डे न बुजविणाऱ्या बांदा ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी बांदेश्वर मंदिर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष उल्हास शेवडे, सुनील माजगावकर, दशरथ परब, संजय नाईक, अनिल म्हाडगुत, अनिल माजगावकर, देवानंद कुबल, प्रशांत म्हाडेश्वर, विशू पावसकर आदी उपस्थित होते.