मद्य पिऊन वर्षा पर्यटन, न्यायालयाचा पर्यटकाला दणका…

471
2
Google search engine
Google search engine

आंबोलीत कारवाई; १० हजार रुपयांचा दंड वसूल…

सावंतवाडी,ता.०१: मद्यधुंद अवस्थेत आंबोलीत येणाऱ्या बेळगाव येथील एका पर्यटकाला सावंतवाडी न्यायालयाने दणका दिला आहे. त्याला तब्बल १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मद्य पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. प्रविण गुरूसिदाप्पा बटगुरकी (रा.बेळगाव) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांकडून आंबोली येथे करण्यात आली होती. तो काल आंबोली येथे आला असताना मद्यधुंद अवस्थेत धागडधिंगा घालत होता. याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ही कारवाई वाहतूक पोलीस मयूर सावंत यांनी केली.

तर अन्य वेगवेगळ्या अन्य ४५ जणांवर कारवाई करून तब्बल ३४ हजार ५०० चा दंड वसूल करण्यात आला आहे. आंबोली वर्षा पर्यटनच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस “अलर्ट” झाले आहेत. अति उत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही कारवाई होत आहे.