डास निर्मूलन करण्यासाठी ८ दिवसात मशिनरी खरेदी करा…

101
2
Google search engine
Google search engine

प्रांतांच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना; रक्तदाता संघटनेच्या पाठपुराव्याची दखल…

सावंतवाडी,ता.०१: शहरात डास निर्मूलन करण्यासाठी ८ दिवसात आवश्यक ती मशीन खरेदी करा आणि प्रत्येक प्रभागात मोहीम राबवा, अशा सूचना सावंतवाडी पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिल्या आहेत. याबाबत युवा रक्त संघटनेच्या माध्यमातून देव्या सूर्याजी यांनी लक्ष वेधले होते. तसेच यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या आहेत.
यावेळी अर्चित पोकळे, राघवेंद्र चितारी, सुरज मठकर, प्रथमेश प्रभू, अभी गवस, दिग्विजय मुरगोड, वसंत सावंत आदी युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य उपस्थित होते.