राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्लेत प्रचार फेरी….

84
2
Google search engine
Google search engine

भाजप आणि स्वाभिमानच्या पदाधिकारी कार्यकरत्यांमध्ये जोश…..

वेंगुर्ले : ता.१२ :
वेंगुर्ले येथे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप व स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामदेवता श्री. रामेश्वर व श्री. सातेरी देवी यांचा आशीर्वाद घेऊन केला. या नंतर शहरात प्रचारफेरी काढून तेली यांच्या कपाट निशाणीची पत्रके वाटून प्रचार करण्यात आला.
वेंगुर्लेत प्रथम श्री रामेश्वर देवाला श्रीफळ अर्पण करून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप तालुकाध्यक्ष बाळू देसाई, स्वाभिमान तालुकाध्यक्ष दादा कुबल, नगरसेवक सुहास गवंडळकर, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे तसेच दाजी परब, भूषण सारंग, दादा केळुसकर, सुषमा खानोलकर, सारिका काळसेकर, वृंदा गवंडळकर, राधा सावंत, विजय नाईक, मनवेल फर्नांडीस, रमेश नार्वेकर, मारुती दोडनशेट्टी, पिंटू परब, शशी परब, रफिक शेख, भूषण आंगचेकर, पपू परब, विकी गावडे यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.