सरपंच पळविणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय…

82
2
Google search engine
Google search engine

राजन तेली;दीपक केसरकर यांच्यावर केली टीका…

दोडामार्ग ता.१७:

सरपंच पळविणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय झाली,असुन गृहराज्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली ती काम करीत आहे.अशी टीका भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज दोडामार्ग येथे केली.येथील भाजपाच्या विर्डी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला होता.या प्रवेशा बाबत बोलताना श्री.तेली यांनी प्रत्युत्तर दिले.
श्री तेली पुढे म्हणाले,येथील भागात झालेल्या पूरस्थितीतील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून आलेली मदत केसरकरांनी आपली म्हणून वाटली. आणि जनतेची दिशाभूल केली असाही आरोप यावेळी तेली यांनी केला.
यावेळी राजेंद्र म्हापसेकर,यशवंत आठलेकर,अनिषा दळवी,रमेश दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.