निवडणूक निकालानंतर राजन तेलींचे राजकीय अस्तित्व संपेल…

85
2
Google search engine
Google search engine

आबा कोंडस्कर; गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिल्याने युतीत दरी…

वेंगुर्ले : ता.१८
पालकमंत्री दीपक केसरकर यांचा विजय निश्चित आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणूक निकालानंतर राजन तेली यांचे राजकीय अस्तित्व संपेल,अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आंबा कोंडस्कर यांनी आज येथे केली.जनसंघ ते भाजप अशी थोर परंपरा लाभलेल्या पक्षात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिल्यामुळेच युतीत दरी निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील जनता नक्कीच त्यांना जागा दाखवून देईल,असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेंगुर्ले शिवसेना शाखेत ते बोलत होते.यावेळी बोलताना तालुकाप्रमुख बाळू परब यांनी सांगितले की, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या जनाशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कोट्यवधींचा निधी
आज केसरकर यांच्या मार्फत आल्याने त्यांच्याशिवाय पर्याय नाही असा ठाम निर्धार येथील जनतेने केला आहे. यामुळे सुज्ञ जनता कोणत्याही आमिषाना बळी पडणार नाही. आणि केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेंगुर्ले शहरातील भाजप पदाधिकारी सांगत आहेत की केसरकर यांनी कोणताही निधी न. प. ला दिला नाही. हे साफ खोटे आहे गेल्या पाच वर्षात २१ कोटी ६९ लाख रुपये एवढा भरगोस निधी देऊन पालकमंत्री यांनी नगराध्यक्ष याना सहकार्य केले आहे. नगरोत्थान मधून ३.७२ कोटी, पर्यटन योजना लाईट हाऊस पर्यंत जाणाऱ्या पायऱ्यांसाठी ९० लाख, नाविन्यपूर्ण योजनेतून ९५ लाख, युडी सिक्स मधून मच्छिमार्केट साठी १ कोटी, तर मच्छिमार्केट साठी चांदा ते बांदा मधून २ कोटी, मल्टीपर्पज हॉल साठी ८५ लाख, अँब्युलन्स साठी १५ लाख आशा प्रकारे आजून कितीतरी निधी नगराध्यक्ष याना विश्वासात घेऊन पालकमंत्री यांनी दिला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष हे निव्वळ खोटे बोलत असून निधी देताना कोणताही पक्षपात केसरकर यांनी केला नाही. तर व्यापारी वर्गाचे केसरकर व शिवसेने माध्यमातुन प्रश्न सुटले आहेत. यापुढेही शहरातील जनतेला पालकमंत्रीच आपल्याला न्याय देतील असा विश्वास असल्याने जनता त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभी राहील असा विश्वास सचिन वालावलकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सभापती सुनील मोरजकर, शहर प्रमुख अजित राऊळ, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, विवेक आरोलकर सहित पदाधिकारी उपस्थित होते.