बलाढ्य शक्ती एकवटल्या तरी जनशक्तीमुळे माझा विजय होईल…

128
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क…

सावंतवाडी ता.२१: माझ्या पराभवासाठी जिल्ह्यातील भाजपासह राणे व पवार अशी बलाढ्य शक्ती एकवटली आहे.मात्र यापेक्षा माझ्यासाठी जनशक्तीच मोठी आहे.त्यामुळे माझा विजय निश्चित,असा दावा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे केला.श्री.केसरकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.यावेळी पत्नी पल्लवी केसरकर,मुलगी सोनाली केसरकर व नातू अर्जुन वगळ आदी उपस्थित होते.