शिवसेना उपतालुकाप्रमुखांची दुचाकी चोरीस…

85
2
Google search engine
Google search engine

बांदयातील घटना;दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद…

बांदा ,ता.०८:
बांदा शहरातील कट्टा कॉर्नर चौकातून शिवसेनेचे उपतालुकप्रमुख साईनाथ उर्फ भैय्या सुरेश गोवेकर यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत बांदा पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार गोवेकर यांनी दिली आहे. चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये चोरटे कैद झाले आहेत. बांदा पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोवेकर यांचे कट्टा कॉर्नर चौक बाजारपेठेत दुकान आहे. सायंकाळी उशिरा नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून आपली दुचाकी तेथेच पार्क करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहिले असता त्यांना दुचाकी दृष्टीस पडली नाही.
गोवेकर यांनी लगत दुचाकीचा शोध घेतला असता त्यांना सापडली नसल्याने त्यांनी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार बांदा पोलिसात दिली. बांदा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कट्टा कॉर्नर चौक व महामार्गावर सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये फुटेज तपासले असता मध्यरात्रीच्या सुमारास दोघे चोरटे दुचाकी ढकलत नेत असल्याचे दिसले. भर चौकातून रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असतानाही दुचाकी चोरीस गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.