सिंधुदुर्गातील विविध समस्यांबाबत काँग्रेस उद्या घेणार जिल्हाधिकार्‍यांची भेट

146
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता.२०:  अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीचे सचिव व कोकण प्रभारी बी.एम. संदिप यांच्या उपस्थितीत गुरूवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना जनतेच्या समस्या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व काॅग्रेस पदाधिकारी, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी ठिक सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्याध्यक्ष विलास गावडे यांनी केले आहे.